१ भारत मेरा घर
' भारत मेरा घर ' अंतर्गत मेघालय राज्यातील २० सेवाभावी कार्यकर्त्यांचा जथा नुकताच १ व २ फेब्रुवारीला दक्षिण गोव्यात येउन गेला . त्यांचा निवास श्री . चंद्रकांत नायक, श्री . गोविंद केळकर यांची घरे व मडगांव कार्यालय येथे होते . दोन दिवसांच्या गोवा दर्शनात श्री . सुदेश पै व श्री . कौतुक बाळे यांनी त्यांना श्रीनागेश , श्रीमंगेश , श्रीमहालसा वेर्णे देवस्थाने, जुने गोवे, कोलवा, बेताळभाटी समुद्रकिनारे , मत्स्य संग्रहालय यांचे दर्शन घडविले . गोव्याचे मुख्यमंत्री श्री . लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या भेटीचाही लाभ त्यांना मिळाला . पक्षभराच्या या दौऱ्यात त्यांनी नागपूर , पुणे यांना भेटी दिल्या असून गोवा मुंबई दर्शनानंतर ते मेघालयात परतणार आहेत .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ' भारत मेरा घर ' हा प्रकल्प चालवीत आहे . मेघालातील जनजातींना उर्वरित भारताचा परिचय व विशेषतः महाराष्ट्र व गोव्यातील नागरिकांना मेघालयातील जनजातींचा परिचय असा दुहेरी कार्यक्रम गेली वीस वर्षे सुरु आहे . मेघालयातून या उपक्रमात सहभागी झालेले बांधव महाराष्ट्र व गोव्यात येतात, येथील कुटुंबात रहातात, चालीरिती, भाषा, संस्कृतीतील साम्य बघतात आणि एकात्म भावनेने भारावून जातात . तसेच महाराष्ट्र व गोव्यातील मेघालय भेटीस गेलेल्या व्यक्ती परत आल्यावर जागृत कार्यकर्ते बनतात .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा