सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

शाखा पत्रक

 शाखा पत्रक १

ओम

मांगल्य

वयं अमृतस्य पुत्रा :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, द. गोवा

( केवळ स्वयंसेवकांसाठी  )

शाखा पत्रक

जानेवारी - फेब्रुवारी २०१७   पौष - माघ युगाब्द ५११८ 

वार्षिकोत्सव
  • शाखेचा वार्षिकोत्सव म्हणजे गावाचे स्नेहसंमेलन होय . 
  • बैठक घेऊन दिनांक, वेळ, स्थान, वक्ता, प्रमुख पाहुणे ठरवावे. 
  • शारीरिक कार्यक्रम, सूर्यनमस्कार, दंड, नियुद्ध, व्यायामयोग, मनोरे, खेळ यांची निश्चिती करावी. 
  • बौद्धिक कार्यक्रम, पद्य, वैयक्तिक गीत, अमृतवचन, सुभाषित, बोधकथा यांची योजना करावी. 
  • घोषाचे आकर्षक असे स्वतंत्र प्रात्यक्षिक व्हावे. 
  • कार्यक्रमाचा स्तर उंचावण्यासाठी गणवेशाचा आवर्जून विचार व्हावा.
  • मैदानाची स्वच्छता, पाणी मारणे, रेषा आखणे, रांगोळी घालणे सुबकरीत्या करावे.
  • कार्यक्रम स्थानी संघ विकासाच्या आयामांची प्रदर्शनी लावावी.
  • संपूर्ण गावात निरोपाची व्यवस्था लावावी. 
  • स्वयंसेवक, प्रात्यक्षिक सहभागी, नागरिक, महिला याची आसनव्यवस्था लावावी. 
  • एकूण कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार करावी. 
  • वार्षिकोत्सव चालू असताना त्याचे थोडक्यात धावते वर्णन करावे.
  •  नागरिक व महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा असे मनोरंजनात्मक खेळ घ्यावेत. 
  • उपस्थित नागरिक व माताभगिनींसाठी चहापानाची व्यवस्था करावी. 
  • आवश्यक तेवढे निधीसंकलन करावे. त्याचे आयव्यय पत्रक बनवावे. ते तालुका कार्यवाहांकडे द्यावे. 
  • वार्षिकोत्सवाची आढावा बैठक घ्यावी.

सुभाषित १

उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् |
वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र संतति: ||
भावार्थ:- समुद्राच्या उत्तरेला व हिमालयासह दक्षिणेला जो प्रदेश आहे त्याला भारत असे नाव असून तिथे राहणारे भारतीय आहेत.

सुभाषित २

यौवनं  धनसंपत्ति प्रभुत्वमविवेकिता  |
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयं ||

भावार्थ :-  तारुण्य, पैसा, सत्ता आणि  अविचार यापैकी एक गोष्ट देखील अनर्थ घडवून आणायला पुरेशी आहे. आणि या चारही एकवटल्या तर !

अमृतवचन १

प.पू. श्रीगुरुजी म्हणतात .....
आज आपली भारतमाता आपल्याला हाक देत आहे. तिला दुसरे काही नको आहे. तिला तिचे तरुण, बुद्धिमान, सेवारत, पौरुषसंपन्न, पराक्रमी पुत्र हवे आहेत. नारायण म्हणजे शाश्वत ज्ञान आणि नर म्हणजे पराक्रम. जेथे या दोघांचा संगम होतो तेथे विजय निश्चित असतो. असे ज्ञानपौरुष संपन्न लोकच इतिहास घडवितात. भारतमातेला आज असेच पुत्र हवे आहेत.
अमृतवचन २

 योगी अरविंद म्हणतात .....
   भूतकाळाचा अभिमान, वर्तमानकाळाच्या परिस्थितीची वेदना व भविष्याबद्धल उत्कट ओढ देशभक्तीरुपी वृक्षाचा बुंधा व फांद्या आहेत . देशासाठी सर्वस्वाचा होम, स्वार्थाचे विस्मरण, श्रेष्ठ सेवा व उच्च कोटीची सहनशीलता हीच या वृक्षाची फळे होत . देशाच्या ठिकाणी मानवतेची अनुभूती घेणे, आईचे रूप पाहणे, तिचाच सतत ध्यास, आराधना व सेवा करणे हाच या वृक्षाला जिवंत ठेवणारा जीवनरस आहे . 
                                                                                   
बोधकथा १

एकदा एका गृहस्थाला नदीवर अंघोळीला जायचे होते . त्याने आपल्या सेवकाला बोलाविले आणि म्हटले, ' नदीवर माणसांची गर्दी आहे कि नाही ते बघून ये. गर्दी असेल तर मी इतक्यात जाणार नाही. थोड्या वेळाने जाईन . '
सेवक नदीवर जाऊन आला . मालकाला म्हणाला, ' नदीवर माणूस कोणीच नाही. '
गृहस्थाने सेवकाला आपले कपडे घ्यायला सांगितले आणि तो नदीवर गेला. पाहतो तो नदीवर गर्दी. तो सेवकावर चिडला.
' अरे, तू मला सांगितलेस कि नदीवर माणसांची गर्दी नाही म्हणून. पण इथे तर गर्दी आहे. '
सेवक उत्तरला, ' मालक, तुम्ही मला माणसांची गर्दी आहे का असा प्रश्न केला होता. समोर बघा तो दगड . रस्त्याच्या बरोबर मध्ये पडलेला आहे. येणारे जाणारे त्याला आपटतात, ठेचकाळतात. प्रसंगी पडून जखमीही होतात. पण माणुसकीच्या भावनेने एकालाही तो दगड बाजूला करता येत नाही. ज्यांच्या मनात माणुसकी नाही त्यांना मी माणूस कसे म्हणावे ? '

बोधकथा २

वनसंचार करता करता ते वाट चुकले. संध्याकाळ झाली, काळोख पडू लागला. रात्र आता रानातच घालावयाची. एक मोठे वडाचे झाड दिसताच त्यांनी त्या झाडाचा आश्रय घेतला. रात्र आणि अनोळखी जागा. पहारा करायचा . एकाने जागे राहायचे, बाकीच्यांनी झोपायचे.
बलरामाने पहिला पहारा सुरु केला. काही वेळ गेला. अकस्मात त्या झाडावरून एक ब्रह्मराक्षस उतरला. ' मी तुम्हाला खातो ' तो उद्गारला. बलरामाला राग आला. त्याने युद्ध सुरु केले. इकडे बलरामाचा राग वाढत होता.  आणि तिकडे ब्रह्मराक्षस मोठा मोठा होत होता. प्रहर संपला, बलरामाने सात्यकीला उठविले आणितो झोपी गेला.
ब्रह्मराक्षस पुन्हा आला. सात्यकीबरोबर युद्ध करू लागला. लढता लढता सात्यकी दात ओठ खात होता आणि इकडे ब्रह्मराक्षस मोठा होत होता. दुसरा प्रहार संपला . सात्यकिने श्रीकृष्णाला उठविले, तो झोपायला गेला.
थोड्याच वेळात ब्रह्मराक्षस पुन्हा आला. जुन्या अनुभवामुळे तो कृष्णाला ललकारू लागला.  श्रीकृष्ण शांत होता. युद्ध सुरु झाले. डाव प्रतिडाव, पेच प्रतिपेच कृष्णाला तो उचकावीत होता. श्रीकृष्णाचे धैर्य वाढत होते, ब्रह्मराक्षस लहान होत होता. प्रहर संपला तेव्हा तो अंगुष्ठमात्र, अंगठ्याएवढाच राहिला होता. श्रीकृष्णाने आपला शेला काढला. त्याच्या टोकाला त्याला बांधून टाकले आणि झोपी गेला.
रात्र संपली. सकाळ उजाडली. सगळे उठले. श्रीकृष्णाने शेल्याची गाठ उसविली. ते ब्रह्मराक्षसाला दाखवीत होते. धैर्य या सौंज्ञेची व्याख्या उलगडत होते.

चर्चा

संघाची रीती नीती

एखाद्या कुळासारखीच संघाची परंपरा, यालाच रीती नीती म्हणतात.
व्यक्तिनिष्ठा नव्हे तत्वनिष्ठा.
संघाचे काम पारिवारिक, प्रवासात घरात व्यवस्था.
शुद्ध सात्विक प्रेम कामाचा आधार.
गुणांची चर्चा व्हावी. दोष केवळ वरच्या अधिका-यांना सांगणे.
वेषभूषा, खाणेपिणे, खर्च करताना साधेपणा, मितव्ययी.
भाषणात, लेखनात योग्य शब्दांचा वापर.
स्वत: काम करणे, श्रेय मात्र दुस-याला.
शुद्ध चारित्र्याचा आग्रह, काया, वाचा, मने प्रामाणिक व्यवहार.
सकारात्मक व्यवहार. अर्धा पेला भरलेला, रिकामा नव्हे.
वेळ पाळणे.
स्वदेशीचा आग्रह.
टाळ्या वाजवत नाहीत. वेळ पाळतात.
समाजाच्या सुखदु:खात सहभाग. वादविवाद टाळीत कामावर भर.
मौनपणे संस्कार, आचरणाचा आदर्श.
अंतिम निर्णय सर्वांचा. अधिका-याची इच्छा प्रमाण.
व्यक्तिगत जीवनात प्रसिद्धि पराङमुखता.
अपेक्षित तेथे उपस्थित.

साद

१. १२ जानेवारीला युवक दिन आहे. जगात हिंदुत्वाची विजयपताका फडकावणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे स्मरण या दिनी आपण करणार आहोत.
२. १५ जानेवारीला मकरसंक्रांती आहे. आपण त्या दिवशी शाखा व साप्ताहिक मिलनस्थानी उत्सव घेणार आहोत. हा व्यापक संपर्काचा उत्सव असल्याने संकल्पित स्थानीही उत्सव व्हावेत. ' तिळगुळ घ्या  आणि गोडगोड बोला ' असे आवाहन करणाऱ्या या दिवशी तालुक्याचा एक मोठा सामाजिक उत्सव आपण करणार आहोत.
३. आपले अ. भा.  कार्यकर्ते श्री . सुहासराव हिरेमठ यांचा प्रवास दक्षिण गोवा जिल्ह्यात आहे. आपल्या प्रवासात ते सर्व नियुक्त कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. आपण दि. १५ जानेवारीला तालुक्यातील पूर्ण अपेक्षित संख्येत या बैठकीला उपस्थित राहणार आहोत.
४. २६ जानेवारी भारतमाता पूजन दिन . आपल्या प्राणप्रिय मातेचे पूजन या दिवशी आपण करतो . समाजातील देशभक्तीच्या भावनेचे संवर्धन यानिमित्ताने आपण करणार अहोत .
५. या कालखंडात  आपल्या शाखा व साप्ताहिक मिलन यांचे वार्षिकोत्सव करणार आहोत. प्रात्यक्षिके, बौद्धिक कार्यक्रम यांची सुनियोजित रचना करीत एक आठवणीत राहील असा कार्यक्रम आपण करणार आहोत.
६. ६ फेब्रुवारीला संपर्क दिन आहे. व्यापक संपर्क, सामाजिक भेटी घेणे, पुस्तके भेट देणे असे उपक्रम यानिमित्ताने आपण करणार आहोत.
७.  आपल्या गोवा विभागाचा होतकरू तरुणांचा वर्ग १२-१३ फेब्रुवारीला आहे. संघासाठी वेळ देऊ शकणाऱ्या तरुणांचे एकत्रीकरण यानिमित्ताने होणार आहे.
८. २३ ते २६ फेब्रुवारी आपल्या कोकण प्रांताचा शारीरिक वर्ग आहे. द्वितीय वर्ष शिक्षित, संघ शिक्षा वर्गात शिक्षक जाणारे, शारीरिक प्रमुख यांच्या या प्रशिक्षण वर्गात चांगल्या संख्येने जाण्याचा प्रयत्न आपण करूया.
९. संघशिक्षा वर्गांचे दिनांक घोषित झाले आहेत. प्राथमिक वर्ग दक्षिण गोवा १७ ते २३ एप्रिल, प्रथम वर्ष ७ ते २७ मे, द्वितीय वर्ष पुणे  १४ ते ४ जून, तृतीय वर्ष नागपूर  १४ ते ७ जून, विशेष प्रथम ७ ते २७ मे, विशेष व्यावसायिक प्राथमिक वर्ग १८ ते २५ जून. आपण आपली अपेक्षित नावे विनाविलंब जिल्ह्याला कळविणार आहोत.

प्रतिसाद

आपल्या जिल्ह्याचे हेमंत शिबिर धारबांदोडा तालुक्यातील उसगाव तिस्क येथे झाले. शिबिराधिकारी मा. राजीव गोविंद ढवळीकर, शिबीर कार्यवाह श्री. एकनाथ गजानन मोरूडकर, शिबीर प्रमुख श्री. गौरीश उत्तम परवार, महाव्यवस्था प्रमुख श्री. तानाजी तामगांवकर, बौद्धिक प्रमुख श्री. अरुण देसाई यांनी शिबिराचे संचालन केले. शिबिराला प्रांत बौद्धिक प्रमुख श्री. उदय वसंत शेवडे पूर्णवेळ उपस्थित होते. समारोपाच्या प्रकट कार्यक्रमात तिस्कवरील निवृत्त शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते श्री. अंकुश नारायण प्रभू प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
शिबिरात एक एक मूठ तांदूळ जमा करून आणायचा ' तंदुलमुष्टिका ' उपक्रम केला गेला. तीन शाखांनी प्रत्येकी एका सेवाकार्याला भेट देऊन भित्तीपत्रक तयार करण्याचा कार्यक्रम केला. शिबिरार्थीद्वारा परिचय पत्रक भरून घेण्याचा उपक्रम केला गेला.
 शिबिरात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. तालुकाश: कबड्डी स्पर्धा प्रथम काणकोण, द्वितीय धारबांदोडा. वैयक्तिक प्रहार स्पर्धा प्रथम- दामोदर गावकर, सांगे, द्वितीय- अमित लोटलीकर, मडगांव, तृतीय- नागेश गावकर, काणकोण.  शिबिराला तालुकाश: शिबिरार्थी उपस्थिती काणकोण-१७,कुंकळ्ळी-१३, केपे -६,सासष्टी-५२, मुरगांव-२४,फोंडा-५०, शिरोडा -११,धारबांदोडा-१, सांगे-१८. एकूण=१९२ शिक्षक-२६, व्यवस्था-५६, गावे-४१, मंडले-३५, शाखा-२९, सा. मिलने-१३. अशी होती .

सेवाकार्य

एम. एस. डब्ल्यू. करून महिला संघटक म्हणून काम करणाऱ्या सुनीता आणि बस्तरला खडतर आव्हानांना सामोरं जायला निघालेले डॉ. राम गोडबोले यांनी लग्नगाठीबरोबरच एकत्र कार्यरत राहण्याची गाठ बांधली. गेली २६ वर्षे हे दोघेही बस्तरमधील आदिवासींचं आरोग्य, कुपोषण, शिक्षण, संस्कृती, व्यसनमुक्ती व आत्मसन्मान यांच्यासाठी झटत आहेत.
‘‘बस्तर प्रदेशातील बारसूर या गावी दवाखान्यात काम करत असताना एक आदिवासी तरुण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘मेरे पिताजी बिमार है, उन्हें देखने आप आओगे?’ मी लगेच निघालो. इंद्रावती नदी पलीकडच्या जंगलात दोन तास चालत आत आत गेल्यावर त्याचं घर आलं. तिथं कळलं की, दोन महिन्यांपूर्वी घराचं छप्पर बांधताना पडल्यामुळे त्याच्या वडिलांना जी हातभर लांबीची जखम झाली होती त्यावर कोणताच इलाज झाला नव्हता. सतत वाहणाऱ्या रक्त-पू यामुळे हात सडण्याच्या मार्गावर होता. मी म्हटलं, ‘इतने दिन चुप क्यों बैठे?’ यावर उत्तर मिळालं, ‘डॉक्टर को बुलाने का तो मालूम नहीं कितना पैसा लेगा.. उपर से पेट्रोल/डिझेल का हिसाब अलग.. डोली से उठा के इतना दूर लाना भी मुश्किल..!’ ते असहाय शब्द माझ्या जिव्हारी लागले. बरोबर आलेल्या मुलाला ड्रेसिंगचं ट्रेनिंग, दहा दिवसांच्या गोळ्या आणि बॅण्डेजची सामुग्री देऊन परतताना माझा निश्चय झाला होता.. या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासींमधूनच आरोग्यरक्षक तयार करायचे, जे रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुवा बनतील. त्यांच्याद्वारे या वंचितांच्या मनात डॉक्टरबद्दल विश्वास निर्माण होईल..’’
वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून गेली २६ र्वष पत्नी सुनीतासह आदिवासींचं आरोग्य, कुपोषण, शिक्षण, संस्कृती, व्यसनमुक्ती व आत्मसन्मान यांसाठी झटणाऱ्या डॉ. राम गोडबोले यांच्या शब्दाशब्दांतून त्यांची तळमळ प्रकट होत होती. त्यांच्या अडीच दशकांच्या तपश्चर्येमुळे, कुठल्याही प्रश्नासाठी मांत्रिकाचे पाय धरणाऱ्या इथल्या आदिवासींची मानसिकता आता डॉक्टरवर विश्वास ठेवण्यापासून त्यांच्याकडून उपचार करून घेण्यापर्यंत बदलली आहे. परिणामी हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. नक्षलवाद्यांनी वेढलेल्या या दुर्गम परिसरात राहून इथल्या आदिवासींच्या जीवनात आरोग्याची पहाट फुलवणाऱ्या या जोडप्याचे समर्पण बघताना ‘सज्जनम् अविरत वंदे!’ हेच शब्द ओठांवर येतात.
डॉ. राम गोडबोले यांना कुठल्याही सामाजिक कार्याची वा कोणत्याही विशिष्ट विचारसरणीची पाश्र्वभूमी नाही. सातारा हे त्यांचं गाव आणि सज्जनगडावर त्यांची विशेष भक्ती. बी. ए. एम. एस ही पदवी घेताच त्यांची पावलं उपेक्षित जिवांची सेवा करण्यासाठी वनवासी कल्याणाश्रम संस्थेच्या नाशिक जिल्हय़ातील कनाशी या केंद्राकडे वळली. ४/५ वर्षांच्या अनुभवानंतर अधिक खडतर आव्हानांना सामोरं जाण्यासाठी त्यांच्यापुढे मेघालय व बस्तर असे दोन पर्याय ठेवण्यात आले. जंगलाचं वेड असल्याने राम यांनी बस्तरची निवड केली. पण नावगावही ठाऊक नसलेल्या, इतक्या दूरच्या भागात एकटय़ाला पाठवायला घरचे तयार होईनात, तेव्हा लग्नाचा विचार पुढे आला.
तेव्हा सुनीता (पुराणिक) एम. एस. डब्ल्यू. करून वनवासी कल्याणश्रमाच्या कर्जत तालुक्यातील जांभिवली केंद्रात महिला संघटक म्हणून काम करत होती. विद्यार्थी परिषदेतून घडलेल्या या मुलीचाही पण होता की, ‘लग्न अशाच व्यक्तीबरोबर करीन, ज्याने आयुष्य सेवेसाठी वाहून घेतलेलं असेल..’ एकाच ध्येयाने झपाटलेले हे दोन जीव एकत्र आले आणि निबिड अरण्यातील बारसूर केंद्रातून एकत्रित सेवेचा त्यांचा पहिला अध्याय सुरू झाला.
बस्तर म्हणजे रामायणातील दंडकारण्याचा प्रदेश. ३९००० चौ. कि. मी. एवढय़ा प्रचंड क्षेत्रफळाचा हा भूभाग छत्तीसगडमध्ये समावेश झाल्यापासून सात जिल्हय़ांत विभागला गेलाय. गोडबोले दाम्पत्य ज्या ठिकाणी कार्यरत आहे ते बारसूर केंद्र दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्हय़ात आहे, परंतु चांगल्या कामाला इथे भीती नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं.
हं, तर नवीन लग्न होऊन दूरवर जंगलात संसार थाटायला निघालेल्या या जोडप्याच्या सामानात काय होतं.. एक बॅग भांडय़ांची, दुसरी पुस्तकांची, एक कपडय़ांचं गाठोडं आणि बाकी पोती व खोकी भरून औषधंच औषधं. तिथला दवाखाना म्हणजे एक मातीची खोली. हे येणार कळल्यावर यांच्यासाठी शेजारी आणखी एक तशीच खोली उभी केली गेली. पावसाळ्यात या मातीच्या जमिनीवर झोपताना आधी प्लॅस्टिक त्यावर सिमेंटच्या रिकाम्या गोणी व नंतर सतरंजी असा बिछाना तयार करावा लागे. वीज नव्हतीच. नैसर्गिक विधींसाठी आडोसा होता हेच खूप. आजूबाजूला जंगली श्वापदांचा वावर असणार हे गृहीतच होतं. केंद्रावर राहणाऱ्या ८/१० आदिवासी मुलींची सोबत तेवढी होती.
सरकारी दवाखान्यांची परिस्थिती तर अधिकच भयंकर. दवाखाना उघडा असेल तर डॉक्टरचा पत्ता नाही. हजर असलाच तर नशेत तर्रऽऽऽ. औषधांचा तुटवडा कायमचा. खासगी डॉक्टर्सकडून वाट्टेल तशी लूट. अशा परिस्थितीत तिथल्या अशिक्षित भाबडय़ा आदिवासींचा विश्वास मिळवणं ही पहिली गरज होती.
इथे येण्यास कोणी तयार नसल्याने दीड र्वष बंद असलेला बारसूर केंद्राचा दवाखाना गोडबोले डॉक्टरांच्या आगमनाने उघडला. पूर्वानुभवावरून आदिवासी रुग्ण, मांत्रिकाचे सर्व उपाय थकल्यावरच आपल्याकडे येणार याची डॉ. रामना कल्पना असल्यामुळे त्यांनी आधीच काही नियम ठरवले. पहिली गोष्ट रुग्णाचं नाव-गाव लिहिण्यात वेळ घालवण्यापूर्वी त्याची तपासणी करायची आणि मुख्य म्हणजे पैशाची भाषा करायची नाही. पुढे ही जेव्हा केंद्रावर अ‍ॅम्ब्युलन्स आली तेव्हा ती डिझेल भरून ड्रायव्हरसकट नेहमी तयार असे/असते. अत्यवस्थ रुग्णाला सलाइन लावूनच १०० कि. मी. वरील एकुलत्या एक रुग्णालयात (जगदलपूर मिल्स) स्वत: घेऊन जाणं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणं हा डॉ. गोडबोल्यांच्या दिनक्रमाचा एक भाग बनला.
या जीवदान मोहिमेबरोबर आदिवासी महिलांमध्ये जागृती आणण्यासाठी सुनीताने कंबर कसली. जागृती.. मुलांच्या शिक्षणासाठी, घराच्या आरोग्यासाठी, जंगलातून कष्टाने गोळा केलेली वनसंपत्ती विकताना जे शोषण होतं त्याचा प्रतिकार करण्यासाठी. सुनीताच्या तोंडून तेव्हाची परिस्थिती ऐकताना अंगावर काटा येतो. म्हणाली, ‘‘हा सर्व प्रदेश घनदाट अरण्याचा. मोहाची फुलं, मध, डिंक, आवळा, चिंच अशा अनेक वनसंपत्तीचं माहेरघर. इथल्या आदिवासी महिला वणवण फिरून गोळा केलेला हा रानमेवा जेव्हा बाजारात विकायला आणतात तेव्हा त्यांच्याशी जो व्यवहार होतो तो तिडीक आणणारा. त्या बायकांच्या डोक्यावरच्या टोपल्या खेचण्यासाठी व्यापाऱ्यांची नुसती स्पर्धा लागलेली. आपलं काम झालं की तिच्या हातावर पाच रुपये टेकवून तिला हाकलून लावायचं. हे बघितल्यावर मी या बायकांच्या बाजूला उभी राहू लागले. ‘‘बिल्कुल हाथ नहीं लगाने का.. उसे पहले सब माल लगाने दो, फिर जिसको बेचना है उसे बेचने दो।’’ माझ्या टिपेच्या आवाजातील आपलेपणा त्या स्त्रियांना जाणवत गेला. पुढे जसजशी त्यांची भाषा येऊ लागली तसतसं आमच्यातील नातंही आकार घेऊ लागलं.
सुनीता काय काय सांगत होती.. सुरवातीला आम्ही जिथे जाऊ तिथे वाद ठरलेला. बसमध्ये पुढे जागा रिकामी असली तरी आदिवासींनी मागेच बसायचं हा नियम. आम्ही आवाज उठवायचो.. ‘वो नहीं उठेगा। आपका क्या कानून है दिखाव..’ आमच्या हस्तक्षेपाने त्या अरेरावी करणाऱ्याचा आवाज खाली यायचा. आणखी एक इथल्या औषधांच्या दुकानांच्या आत त्या दुकानदाराचा स्वत:चा अवैध दवाखाना. अशिक्षित आदिवासींच्या गळ्यात त्यांना आवश्यक नसणारी औषधं/ इंजक्शन, बिनदिक्कत मारण्याची सवय हाडीमाशी खिळलेली. या सर्वातून त्यांना न्याय मिळवून द्यायचा हेच आमचं ध्येयं. तेव्हाही आणि आत्ताही.
अशा प्रकारे उपेक्षितांशी नाळ जुळत असतानाच २००२ मध्ये कौटुंबिक कारणांसाठी त्यांना महाराष्ट्रात परत यावं लागलं. पण वनवासींची सेवा करण्याचा आपला वसा त्यांनी इथे सुरू ठेवला. ठाणे जिल्हय़ातील विक्रमगड केंद्रावर डॉक्टरांनी केंद्रप्रमुख ही जबाबदारी स्वीकारली व त्याबरोबर आरोग्यरक्षक योजनेची धुराही खांद्यावर घेतली. सुनीतानेही वनवासी कल्याणाश्रमाच्या महिला विभागाची सूत्रं हाती घेतली. परंतु या दोघांचा जीव बस्तरच्या पहाडीमधील आदिवासींमध्ये गुंतला होता. ही ओढच त्यांना इथे पुन्हा घेऊन आली. २०१० पासून दंतेवाडा जिल्हय़ातील बारसूरमध्येच दाम्पत्याची दुसरी इनिंग सुरू झाली.
मधल्या काळात बरीच उलथापालथ झाली होती. छत्तीसगडची निर्मिती झाल्यामुळे गावागावांना जोडणारे पक्के रस्ते झाले. त्यामुळे रस्त्यालगतच्या गावांना आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध झाल्या. म्हणून डॉक्टरांनी प्रत्यक्ष दवाखाना न चालवता, जंगलातील गावागावांत जाऊन आरोग्य शिबिरं घेण्याचा धडाका लावला. दर महिन्याला दोन ते तीन कॅम्प, त्यात आढळलेल्या रुग्णांचा ते बरे होईपर्यंत पाठपुरावा आणि त्याला जोडून जनजागृती हा त्यांचा सध्याचा जीवनक्रम.
कुपोषणावर मात करण्यासाठी गोडबोले पती-पत्नीने पंचायतीने नियुक्त केलेल्या मितानीनना (आरोग्य मैत्रीण) हाताशी धरलं. त्यांचे ग्रुप करून त्यांना पोहे, नाचणी, मका, तांदूळ अशा स्थानिक अन्नधान्यांपासून करता येणाऱ्या पौष्टिक पाककृती शिकवल्या. त्या त्यांना खाऊ घातल्या. सोबत कोरडा शिधा दिला आणि आपापल्या गावांतील स्त्रियांना हे पदार्थ शिकवण्याची जबाबदारी सोपवली. याबरोबर साथीचे रोग होऊ नयेत म्हणून व झाले तर कोणती काळजी घ्यायची ते जगण्यातील उदाहरणे देऊन समजावलं. त्यांच्याबरोबर ४५ आरोग्यरक्षकांची बॅचही आपापल्या गावच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार झालीय.
इथे पाच-सहा वर्षांची मुलंदेखील गुटखा/पान खाताना सर्रास दिसतात. त्यांना व्यसनांपासून वाचवण्यासाठी, अवयव निकामी कसे होतात, ते खेळाद्वारे सांगणारा नवा उपक्रम त्यांनी चालू केलाय. शाळाशाळांमधून चालणाऱ्या अशा प्रबोधनासाठी पुण्याच्या ‘तथापि ट्रस्ट’ने साधनं पाठवलीयत. पुण्याच्याच ‘कृतज्ञता ट्रस्ट’ने औषधं, इंजेक्शन्स आणि सोलर लॅम्प्स पुरवण्याची जबाबदारी घेतलीय. ज्ञानप्रबोधिनीही पाठीशी आहेच.
गोडबोले दाम्पत्याचं झपाटलेपणही त्यांच्या चार आदिवासी सहकाऱ्यांमध्येही (अंती, चितू, मोंडो व नारायण) पुरेपूर भिनलंय. आपल्या अशिक्षित बांधवांना न्याय मिळवून द्यायचा, नुसता सल्ला नाही, ही डॉक्टरांची शिकवण त्यांच्या कृतीतून दिसते. म्हणूनच जंगलातून कितीही अंतर तुडवायला आणि प्रसंगी एखाद्याला जाब विचारायला हे शिलेदार मागे-पुढे बघत नाहीत.
गेल्या तीन वर्षांपासून डॉ. राम गोडबोलेंना डॉ. करमाळकर या हृदयरोतज्ज्ञाच्या समर्थ हातांची साथ मिळालीय. हे डॉक्टर हैदराबादहून प्रत्येक महिन्यातील तीन दिवस येतात. त्या वेळी लावण्यात येणाऱ्या शिबिरासाठी आरोग्यरक्षक रुग्णांना शोधून शोधून आणतात. दिवसभर तपासण्या झाल्यावर आवश्यकतेनुसार इतर मोठय़ा तपासण्या व उपचारांसाठी जगदलपूर वा रायपूरचं हॉस्पिटल ही पुढची जबाबदारी व पाठपुरावा याला डॉ. गोडबोल्यांशिवाय पर्याय नाही.
५५/५६ च्या घरात असलेल्या गोडबोले दाम्पत्यावर सध्या पालकत्वाची एक नवी जबबदारी पडलीय. हे हवंहवंसं पालकत्व आहे. इथे मदतीला येणाऱ्या तरुण मुला-मुलींचं. कौस्तुभ देशपांडे व प्रणीत सिंहा हे पुण्याच्या आयसरचे विद्यार्थी डिसेंबर २०१२ मध्ये इथल्या शाळांमध्ये विज्ञान आधारित खेळणी दाखवण्यासाठी १५ दिवसांची सवड काढून आले. तेव्हापासून प्रणीतची पावलं मागे वळलीच नाहीत. शिक्षणविषयक इतर उपक्रमांसाठी गेल्या दोन वर्षांपासून इथे ठाण मांडून बसलेली अकलूजची ज्योती पटाले (इंजिनीयर) आणि सुनीताताईंना मितानीन प्रकल्पात वर्षभर साहाय्य करणारी नाशिकची आहारतज्ज्ञ गौरी वझे या मुलीचं योगदान अभिमान वाटावं असंच.
ध्येयपूर्तीसाठी अविरत काम हेच जीवन मानणाऱ्या या दाम्पत्याच्या आपल्या देशबांधवांकडून दोनच अपेक्षा आहेत. एक तुमच्या आयुष्यातील किमान १५ दिवस द्यावेत. सुट्टय़ांमध्ये काही तरी वेगळं करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं इथे स्वागत आहे आणि दुसरं जंगलाच्या आतील गावात, तिथल्या तिथे रोगनिदान करता येईल अशा मोबाइल डायग्नोस्टिक लॅब या पोर्टेबल, बॅटरी ऑपरेटेड मशीनसाठी अर्थसाहाय्य. तुम्ही कोणता पर्याय निवडताय ?

   संस्कारगीत 

हिंदू हिंदूच्या मनी जागवू शुभ चेतना एकतेची भावना ॥ध्रु॥
हिंदी मराठी द्राविडी वा काश्मिरी वा गुर्जरी
भिन्न भिन्न विराजती भाषा जरी जिव्हेवरी
परि अंतरी सुरभारती ती पूज्य सर्वा आपणा ॥१॥
श्रीकृष्ण बुद्ध जिनेन्द्र नानक बसव नायन्मार ते
चैतन्य शंकरदेव ज्यांचे संप्रदाय विभिन्न ते
परि पुण्यशील चरित्र त्यांचे पूज्य सर्वा आपणा ॥२॥
सधन कोणी अधन वा अल्पज्ञ कुणि सर्वज्ञ ते
प्रखर भगवद्भक्त आणि नितान्त नास्तिकवर्य ते
परि राष्ट्रसेवानिष्ठ जे जे वन्द्य ते ते आपणा ॥३॥
नामरूपे कोटि कोटि एक आत्मा सर्वभूती
वेद गीता सकल ऋषि मुनि मंत्र एकचि गर्जताती
मनन संतत करुनि त्याचे शुद्ध करु या जीवना ॥४॥
भेद तितुके स्वार्थमूलक पापकारक तापदायक
द्वेषवर्धक शक्तिनाशक ऐक्यबाधक राष्ट्रघातक
एकात्म भारत व्हावया निःस्वार्थ करु या जीवना ॥५॥

संघगीत १

मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते
रीत साधी शिस्त बांधी कार्य व्यापक उभवी ते ॥धृ॥
व्यक्ती व्यक्ती जमवुनी भवती जागृत करणे तयाप्रती 
मनात प्रीती हृदयी भक्ती संघटनेने ये शक्ती ॥१॥
असोत जाती नाती गोती नसे तयांची आम्हा क्षिती 
नकोच कीर्ती नको पावती सेवा करणे निस्वार्थी ॥२॥
हिंदू अवघा बंधू बंधू भारतभूचा पुत्र असे
वंदूनि माता गौरव गाता सार्थक त्याचे होते असे ॥३॥
युगायुगातुन इतिहासातून पराक्रमाची परंपरा
दरीदरीतून मैदानातून चिरंस्फूर्तीचा इथे झरा

संघगीत २

भारत वन्दे मातरम जय भारत
वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम्

भारत वन्दे मातरम् जय भारत वन्दे मातरम्
रुक ना पाये तूफानो मे सबके आगे बढे कदम

जीवन पुष्प चढाने निकले माता के चरणोमे हम ॥धृ॥

मस्तक पर हिमराज विराजित उन्नत माथा माता का

चरण धो रहा विशाल सागर देश यही सुन्दरता का

हरियाली साडी पहने मा गीत तुम्हारे गाए हम ॥१॥

नदियन की पावन धारा है मंगल माला गंगा की

कमर बन्ध है विंध्याद्रि की सातपुरा की श्रेनी की

सह्याद्रि का वज्रहस्त है पौरुष को पहचाने हम

नही किसी के सामने हमने अपना शीश झुकाया है

जो हम से टकराने आया काल उसी का आया है 

तेरा वैभव सदा रहे मा विजय ध्वजा फहराये हम ॥३॥  

ओम

मांगल्य

वयं अमृतस्य पुत्रा :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, द. गोवा

( केवळ स्वयंसेवकांसाठी  )

शाखा पत्रक

मार्च - एप्रिल २०१७  फाल्गुन - चैत्र युगाब्द ५११८ - १९ 

चिंतन

संघशिक्षा वर्गाचे महत्व

        संघात कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण वर्गांची योजना केलेली  आहे . साधारणतः  एप्रिल, मे, जून  महिन्यात ८ दिवसांचा प्राथमिक वर्ग, २० दिवसांचे प्रथम व द्वितीय वर्ष वर्ग , २५ दिवसांचा तृतीय वर्ष संघशिक्षा वर्ग घेतले जातात . पूर्ण वेळ निवासी पद्धतीने हे वर्ग होतात . वास्तविक रोजची शाखा तसेच नित्य बैठका यात प्रशिक्षण होत असतेच . पण त्यात गती सावकाश असते . निवासी वर्गात वेळ अधिक मिळतो . त्यामुळे सामूहिक स्वरूपात असे प्रशिक्षण देण्याची पद्धती संघात विकसित झाली . आज कार्यकर्त्याच्या  दृष्टीने तसेच संघटनेच्या दृष्टीनेही  हे वर्ग महत्वपूर्ण ठरले आहेत .
        वर्गात स्वयंसेवक मनोरंजन, मौजमजा किंवा वेळ घालविण्यासाठी येत नाही . हिंदू संघटनेचा राष्ट्रीय गंभीर उद्देश पूर्ण करण्यासाठी तो वर्गात येतो . मनापासून संघाचे अधिकाधिक शिक्षण घेण्यासाठी येतो . कुणाच्या दबावाखाली नाईलाजाने नव्हे तर स्वयंप्रेरणेने येत असतो . म्हणून रोज मी नवे काही ना काही तरी शिकणार याचा निश्चय तो करतो . हे संघाचे शिक्षण मी कधीही विसरणार नाही . स्वतः च्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्याचा उपयोग करणार नाही . कधीही निष्क्रिय होणार नाही हा दृष्टीकोन संघाचा स्वयंसेवक बाळगीत असतो.
        संघाचे महान ध्येय साध्य करण्यासाठी हव्या असलेल्या शारीरिक क्षमतेचा विकास वर्गात होत असतो . उत्तम आरोग्य व सहयोग प्रवीणता असेल तर निरोगी मन बुद्धी व योजना कौशल्य याची वाढ होत असते . वर्गातील शारीरिक कार्यक्रमांमुळे त्याच्यात उत्साह , स्फूर्ती , स्थिरता तसेच क्षमता या गुणांचे संवर्धन होते . अत्यंत महत्वाचा समुदायिकतेचा, अनुशासनाचा संस्कार होतो .त्याला उत्कृष्ट व दर्शनीय तसेच प्रभावी कार्यक्रम घेण्याची क्षमता प्राप्त होते .
        वर्गात बौद्धिक वर्ग, चर्चा, श्रेणी बैठका व अन्य बौद्धिक कार्यक्रम  होतात . यामधून स्वयंसेवक संघ समजून घेतात . आपल्या कार्यक्षेत्रात गेल्यावर संघ समजावून  सांगता येईल अशी वैचारिक क्षमता ते प्राप्त करून घेतात . आपल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यासाठी लागणारी तन्मयता मिळवितात . अधिकाधिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपली पात्रता ते विकसित करतात . लोकांच्या शंकांचे निरसन करणे तसेच त्यांच्या प्रश्नांना संतुलित उत्तरे देण्याची क्षमता वर्गातील  बौद्धिक कार्यक्रमातून विकसित होत जाते .
         वर्गात स्वयंसेवकांचा भावनात्मक विकास होत असतो . त्याचा संघाबद्धलचा आपलेपणा वाढीस लागतो . आपले राष्ट्र, संस्कृती, परंपरा यांच्याविषयी  आत्मीयतेत वाढ होते  . आपला इतिहास, महापुरुष, आपले मानबिंदू यांच्याबद्धल उत्कट प्रेम व भक्ती निर्माण होते . संघबंधू संबंधात प्रेम व बंधुभाव वाढीस लागतो . ज्येष्ठ स्वयंसेवकांविषयी आदर वाटू लागतो . समवयस्क कार्यकर्त्यांशी निष्कपट मैत्रीसंबंध निर्माण होतात . लहान स्वयंसेवकांचे सहजभावें कौतुक आपण करू लागतो . आपल्या बोलण्यात माधुर्य येते . लाभाच्या विषयात मागे राहताना साधेपणाचा प्रवेश आपल्यात कधी होतो आपल्यालाही कळत नाही .
        संघशिक्षा वर्गात अनुशासनात राहण्याची स्वतःची क्षमता विकसित होत जाते . उच्च आदर्शाने प्रेरित झालेल्या उत्तमोत्तम कार्यकर्त्यांशी आपला परिचय होतो . हिंदुराष्ट्राच्या सानुल्या रूपाचे दर्शन घडते . संघाची विराट शक्ती, समाजात प्राण संचारण करण्याची त्याची संचारण क्षमता याचे दर्शन घडते .
        वर्गात नवीन कार्यकर्त्याचा विकास होतो . शिक्षार्थी, शिक्षक, प्रबंधक सर्वानाच हा अनुभव प्रेरणादायी असतो . जुन्या कार्यकर्त्यांचा कार्य अभ्यास होतो . वर्ग होतो त्या स्थानिक शाखेला वर्गाचा चांगला लाभ मिळतो . संपूर्ण क्षेत्रात सूत्रबद्धता व एकात्मभाव निर्माण होतो . आपल्यातील उणिवा समजून येतात . अनेक नवनवीन सूचना, प्रस्ताव येतात . नवीन योजनांची दृष्टी प्राप्त होते . वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घनिष्ठ संपर्काचा लाभ होतो . वर्गामुळे सामूहिक योजनांचे क्रियान्वयन करण्याच्या क्षमता अजमावून पाहता येतात . निमंत्रितांना वर्ग दाखविण्याच्या निमित्ताने व्यापक संपर्क स्थापित होतो . वर्गात सहभागी झालेला स्वयंसेवक आपला गणवेश आपण करतो. प्रवास खर्च, शुल्क  देतो . यामधून सामाजिक कार्य स्वतःच्या पैशातून करण्याचा संस्कार त्याच्यावर होतो .
         
सुभाषित १

विद्या ददाति विनयं विनयात् याति पात्रताम्  |
पात्रत्वाद्  धनमाप्नोति धनात् धर्म ततः सुखम्  ||

भावार्थ :- विद्या विनयला जन्म देते . विनयामुळे व्यक्तीला पात्रता प्राप्त होते . पात्रतेमुळे धन मिळते . धनामुळे धर्माचरण करणे सुलभ बनते . आणि अंततोगत्वा सुखाची प्राप्ती होते .

सुभाषित २

स्नेहं दया च  सौख्यं च यदि वा जानकीमपि  |
आराधनाय लोकानां मुन्च्यतो नास्ति मे व्यथा ||

भावार्थ :-  प्रजेच्या सुखासाठी कोणताही त्याग करण्यास मी दुख: मानणार नाही. प्रेम, दया, सुख, इतकेच नव्हे  तर वेळ आल्यास  प्रत्यक्ष जानकीचाही त्याग करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही.

अमृतवचन १

 आपल्या डॉक्टरांचे जीवन तत्वरूप बनले होते. त्यांचे जीवन भव्य, स्फूर्तिप्रद राष्ट्र्कार्याशी समरस,एकरूप झाले होते.अनेक श्रेष्ठ गुणांच्या पैलुंनी त्यांचे जीवन विकसित झाले होते. त्यांच्या श्रेष्ठतम जीवनाचा काही अंश आपणाशी प्राप्त व्हावा, त्यांच्यासारखे निरलस राष्ट्रभक्तीने ओथंबलेले अन्त्ह्करण लाभावे यासाठी आपण त्यांचे नित्य स्मरण केले पाहिजे. त्यांचे श्रेष्ठ गुण अंगी आणल्याने आपल्या राष्ट्राचे सुख समृद्धीयुक्त एकात्मजीवन निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी येईल.  

अमृतवचन २

पू . श्रीगुरुजी म्हणतात ,
समाज संघटित करण्यासाठी संघशाखांच्या भक्कम आधारावर निरनिराळ्या क्षेत्रात आपल्या विविध गुणांचा उपयोग करीन हा विचार प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात पक्का रुजविणे व त्याला कार्यासाठी उत्साह देणे आवश्यक आहे .
                                                                                   
बोधकथा १

 एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की,
" लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत.  "
नवरा बायकोला म्हणतो, साबण संपला असेल.
दुसर्‍या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की,
" लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत "
कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.
नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते.
एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्‍याला म्हणते
" अहो ऐकलंत का?
समोरच्या वहिनी सुधारल्या.
त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते.
आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत "
तेवढयात नवरा बोलतो
" मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या.
काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने स्वछ पुसून घेतल्या.  त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात.
समोरचे रोजच कपडे स्वच्छ धूत होते.
परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांचे  कपडे तुला खराब दिसत होते .
समोरचे नाही आपणच सुधारलोय.

बोधकथा २

मुलाला गूळ खाण्याची खूप सवय होती . व्यसनच म्हणा ना ! कितीही सांगितले तरी तो ऐकायचा नाही . आईने स्वतः किती प्रयत्न केले . शिक्षकांना, गावाच्या लोकांना सांगायला सांगितले . सांगितले तेवढाच वेळ . पुनः ये रे माझ्या मागल्या . आईने त्याला वैद्याकडे न्यायचे ठरविले .
एके दिवशी आई मुलाला घेऊन वैद्याकडे गेली . वैद्याने चौकशी केली . येण्याचे कारण विचारले . आईने  आपल्या येण्याचे कारण सांगितले . मुलाच्या गूळ खाण्याच्या वाईट सवयीविशी तक्रार केली . मुलाला काहीतरी सांगण्याची विनंती केली . वैद्य आपले काम करीत राहिला . त्याने त्यांना घरी जायला सांगितले .
मुलाची सवय चालू होती . आईने पुन्हा वैद्याकडे जायचे ठरविले . आणि मुलासमवेत ती गेलीही . वैद्याला तिने पुनः विनंती केली . वैद्य काही बोलला नाही .
महिन्याभराने ती परत गेली . वैद्याने मुलाला आपल्या समोर बसविले . तो म्हणाला, " मुला, तू गूळ खातोस . खातोस ते ठीक आहे . पण तू खूप खातोस . खूप खाणे हे बरोबर नाही . हि वाईट सवय आहे . गूळ खाणे सोडून दे . "
आई घरी आली . आणि काय आश्चर्य ! त्या दिवसापासून मुलाने गूळ खाणे सोडून दिले . काही दिवसांनी आई त्या वैद्याकडे गेली . ती म्हणाली, " महाराज, तुमच्या साध्या दोनचार वाक्यांनी माझ्या मुलाची दीर्घ काळाची वाईट सवय सहज निघून गेली . मला आश्चर्य वाटते त्या गोष्टीचे की, ती साधी चारदोन वाक्ये सांगायला तुम्ही मला तीन वेळा का बोलाविले ? "
मंद स्मित करीत वैद्य म्हणाले, " ते दोन महिने मला माझी गूळ खाण्याची सवय मोडायला लागले . "

चर्चा १

स्वयंसेवकाचा सूक्ष्म दृष्टिकोन

१. कार्यक्रम आमच्या संघाचा नव्हे, आपल्या संघाचा.
२. यथाशक्ती नव्हे, तनमनधनपूर्वक.
३. दान नव्हे, समर्पण.
४. त्याग नव्हे, कर्तव्य.
५. सुमारे पाच वाजता नव्हे, ठीक पाच वाजता.
६. संख्या २७-२८ नव्हे, २७ किंवा २८.
७. तुम करो राष्ट्र आराधन नव्हे, हम करे राष्ट्र आराधन.
८. समाजातील संघटन नव्हे, समाजाचे संघटन.
९. मला मरायचे कसे शिकवा नव्हे, मला जगायचे कसे शिकवा.
१०. शीख आणि हिंदू नव्हे, केशधारी व सहजधारी हिंदू.
११. हिंदू मुस्लिम दंगा नव्हे, मुस्लिम दंगा.

चर्चा २

समाजात नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण

  • समाजावरील प्रेम व सामाजिक समस्यांच्या संदर्भात संवेदना व्यक्त करणारे व्यक्तिमत्व . 
  • सामाजिक परिस्थितीची समज . 
  • योजकता व संघटन कुशलता. माणसे जोडण्याचा स्वभाव . 
  • नेतृत्व करणाऱ्या महापुरुषांच्या जीवनाचे अध्ययन व त्यापासून प्रेरणा . 
  • परिस्थितीमुळे निराश न होणारा. विपरीत परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेऊन आशेचा किरण बनणारा
  •  ध्येयावर अविचल निष्ठा . 
  • उत्तम निर्णय क्षमता . समस्या न टाळता तिचा सामना करायचा . 
  • अडचणींना संधीच्या स्वरूपात बदलणारा . 
  • बुद्धीचातुर्य असणारा . 
  • शुद्ध चारित्र्य असलेला .

साद

१. गुढीपाडवा हा नववर्षदिन . संघाचा वर्षारंभी उत्सव . वर्षप्रतिपदेचे उत्सव आपण शाखाशः घेणार आहोत . तालुक्यात एक मोठा उत्सव घेऊयात .
२. गुढीपाडवा हा संघसंस्थापक परम पूजनीय डॉक्टर केशव बळिराम हेडगेवार यांचा जन्मदिन . संघयुगाच्या शालिवाहनाचे पू . डॉक्टरांचे या दिनी आपण कृतज्ञता पूर्वक स्मरण करतो  . त्यांना आद्यसरसंघचालक प्रणाम देतो .
३ . नववर्षदिनी हिंदुसमाज प्रभातफेऱ्या, मंगलयात्रा, मिरवणुका काढतो. यामध्ये जास्तीत जास्त संख्या राहील असा प्रयत्न आपण करणार आहोत .
४ . मे महिना हा संघ प्रशिक्षण वर्गांचा महिना . गेले वर्षभर ज्या स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी संघकामात भाग घेतला त्यांना पैलू पाडण्यासाठी, संघकामाचे प्रशिक्षण देण्यासाठी या संघशिक्षावर्गात पाठविणार आहोत .

प्रतिसाद

१ . आपले अखिल भारतीय सेवा प्रमुख श्री. सुहासराव हिरेमठ यांचा प्रवास दक्षिण गोवा जिल्ह्यात झाला. शांतिनगर, मडगांव येथील षण्मुखानंद सभागृहात (श्रीगणपती मुरुगन मंदीर)नियुक्त कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी घेतली. प्रत्येकाने किमान एका ठिकाणी शाखा सुरु करावी असे आवाहन त्यांनी केले . एकूण ४८ कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.
२ . मडगांव शाखेने भारतमाता पूजनाचा कार्यक्रम श्रीमारुती मंदिर, दवर्ली येथे घेतला . एकूण २५ जणांनी पूजन केले . 
३ . शनिवार दि. ११ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता दक्षिण गोवा जिल्ह्याचा शारीरिक वर्ग मडगांव कार्यालयात झाला. आपले कोकण प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख श्री. उमेश धामणकर या वर्गात पूर्णवेळ उपस्थित होते. रविवारी ११ वाजता वर्ग समापन झाले. शारीरिकाची आवड असलेले २४ जण सदंड पूर्ण गणवेशात ठीक वेळेवर वर्गस्थानी उपस्थित होते.
४ . आपल्या फोंडा तालुक्यातील बोकडबाग बाल तरुण शाखेचा वार्षिकोत्सव रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी संपन्न झाला. उत्सवाला राजमाता पद्मावती सौंदेकर हायस्कूलचे कला शिक्षक श्री. कलानंद बांबोळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने ' मधुमेह तपासणी उपक्रम ' सुरु झाला. एकूण ३८ जणांची तपासणी करण्यात आली. सूर्यनमस्कार, व्यायामयोग, नियुद्ध, दंड व समता यांची प्रात्यक्षिके करण्यात आली. प्रास्ताविक, परिचय, सांघिक गीत, अमृतवचन, वैयक्तिक गीत झाले. प्रमुख वक्ते जिल्हा प्रचार प्रमुख श्री. कौतुक बाळे यांचे बौद्धिक झाले. उत्सवाला ता. कार्यवाह श्री. कुमार वझे, सहकार्यवाह श्री. देवेंन्द्र शिलकर उपस्थित होते. संघ प्रार्थना झाली. उपस्थितांना पेयपान देण्यात आले. ५८ नागरिक माताभगिनींची उपस्थिती उत्सवाला होती.

शाखा वेळापत्रक

 ( बाल तरुण, व्यावसायिक )

शाखा शुभारंभ, ध्वजारोहण                                      ३ मिनिटे
द्रुतगती योग, सूर्यनमस्कार                                      ५ मिनिटे
प्रहार                                                                        २ मिनिटे
खेळ                                                                         २० मिनिटे
शारीरिक                                                                  १० मिनिटे
समता, संचलन                                                         ५ मिनिटे
बौद्धिक कार्यक्रम                                                       १० मिनिटे
शाखा समापन, प्रार्थना, ध्वजावतरण                         ५ मिनिटे

( प्रौढ शाखा )

दीर्घश्वसन                                                               ५ मिनिटे

   संस्कारगीत 

एक दे वरदान आई एक हे वरदान दे
संभ्रमी पार्थास या गीतेपरी तू जाण दे ।।धृ।।

तू जगाची जन्मदा तू वीरप्रसवा माउली
तू अनादी थोरवी तव देवतांनी गाइली
आज आम्हा हिंदू मी हे सांगण्या अभिमान दे ।।१।।

 विस्मृतीने लोपलेल्या अस्मितेला जाग दे
प्रलयकारी भैरवाचा क्रोध दे रणराग दे
अंतरी वेदांतले ते पुण्यपावन ज्ञान दे ।।२।।

हिंदू हिंदू एक अवघा भावना ही जागवी
देशभक्तीची चिरंतन ज्योत हृदयी चेतवी
नित्य अधरी आमुच्या तव कीर्तीचे यशगान दे ।।३।।

दाटता नैराश्यतम तू स्फूर्तीचा आलोक दे
विसरता पथ साधनेचा जागृतीची हाक दे
संकटांचा पथ दे पण पार करण्या त्राण दे ।।४।।

तव पुरातन वैभवाचे स्वप्न नित या लोचनी
केशवाने दाविलेले ध्येय अमुच्या जीवनी
पूर्ण व्हाया ते करी या राघवाचा बाण दे ।।५।।

संघगीत १

सन्मानाने गातील सारे गीत आमुच्या विजयाचे
हिंदू असतील भाग्यविधाते आगामी शतशतकांचे  ॥ध्रु॥

बंधुत्वाच्या व्रतास नाही अंशमात्रही खंड इथे
समाजपुरुषाच्या चरणाशी वंदू आम्ही एकमते
सतत चालणे आहे आता नाव नसे विश्रामाचे ॥१॥

समरसतेने सुसंघटित हा समाज घडवूया सारा
सुखसमृद्धी अन प्रगतीचा नभात उभवुया तारा
भेदभाव गाडुनी करूया उच्चाटन विषवल्लीचे ॥२॥

दरिद्रनारायण हा आहे सर्वजणांचा भगवंत
सेवाभावाच्या आधारे बनवू भारत बलवंत
वंचित कुणीना राहो येथे यास्तव जीवन जगायचे ॥३॥

संघगीत २

मनामनात जागवा मंत्र हा नवा  
आपुला समाज नेऊ परमवैभवा ।। धृ ०।।

अंतरात मातृभूचि मूर्ति स्थापिली 
शक्ती, बुद्धि, संपदा तिलाच अर्पिली 
चित्तही तिचे, तिचीच कीर्ती मान्यता 
तिच्या सुखात सौख्य, वैभवात धन्यता 
संचरु जगी स्मरु तिचाच जोगवा ।।१।।

शक्ति, शील, ज्ञान, ध्येयनिष्ठ एकता
करु सजीव जीवनात त्याग बंधुता 
व्यक्ति व्यक्ति घडविणे मार्ग हा भला 
अढळ चालु या व्रतास आचरु चला  
संघ वाढवून राष्ट्रधर्म वाढवा ।।२।।

एक आस मार्ग हाच सतत चालणे 
धर्म रक्षुनी परस्परांस राखणे 
सत्य, न्याय, नीति, पंथ ईश राखती 
अंतस्थ होउनी जगास तारिती 
कृपेस त्या शिरी धरुन विजय मेळवा ।।३।।

उदो उदो आईचा त्रिभुवनी असो 
धुंदवीत दशदिशा मंत्र हा दिसो 
संघशक्ति प्रबळ ही प्रकट जाहली 
रक्षण्यास हिंदुधर्म सिद्ध जाहली 
शासण्या मदांधता विराट जागवा ।।४।।  

अन्य काही पूरक

असा देश हा भव्य ऐसा पवित्र ।
दिला ईश्वराने; वसे तोहि अत्र ।।
असे हिंदूंना तोच आनंद ठेवा ।
म्हणोनी श्रमानें तयाला जपावा ।।

नद्या वाहती पूत येथें अनेक ।
असे भू वनश्रीयुतां ही विलोक ।।
पहा रक्षण्या हे उभे ठाकलेत ।
गिरी कैक उत्तुंग या भारतात ।।

नका संकटांना  भिऊं, येऊं द्या ती ।
समर्थापुढे संकटें नम्र होती ।।
तरी भीरु हिंदू कधीही नसावा ।
खरा वृत्तीने वीर, खंबीर व्हावा ।।

करू द्या जगाला सुखेनैव निंदा ।
तरी हा न सोडा स्वराष्ट्रीय धंदा ।।
मनींच्या मनी राग त्यांचा गिळावा ।
वरी शांत; आंतून हिंदू जळावा ।।

२ 
शाखा पत्रक २ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा