सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

चर्चा

चर्चा  

१ संघ कार्य परिस्थिती निरपेक्ष
शासनसंस्था
३ समाजात नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण 
४ स्वयंसेवकाचा सूक्ष्म दृष्टिकोन 


१ संघ कार्य परिस्थिती निरपेक्ष

बहुतेक कार्ये तात्कालिक समस्येची प्रतिक्रिया म्हणून निर्माण.
संघकार्य हिंदु समाजाची संघटीत स्थिती स्थायी व्हावी म्हणून.
हे सकारात्मक व विधायक कार्य.
राष्ट्र पोषक अशी ही भावात्मक गरज.
समाजाच्या कोणत्याही स्थितीत हे काम आवश्यक.
थंडी, ऊन पावसातही शाखेचा आग्रह.
तीन बंदींच्या अग्निपरीक्षेतून तेजस्वी होऊन संघ बाहेर पडला.
सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती विपरीत असूनही ध्येयाकडे वाटचाल.
पू.डॉक्टर, पू. गुरूजींच्या निधनानंतरही नवनवीन आयाम व क्षेत्रे जोडली गेलीत.
आव्हांनासाठींचे चाललेले कार्यक्रम परिस्थिती सापेक्ष.
राष्ट्रासाठी चाललेले संस्कारित व्यक्ति निर्माणाचे संघकार्य मात्र परिस्थिती निरपेक्ष, सतत चालणारे.


 २ शासनसंस्था

शासनसंस्था समाजातील एक महत्वाची संस्था.
तिचा समाजजीवनावर मोठा प्रभाव.
लोकशाही इतर राज्यव्यवस्थांच्या तुलनेत उत्तम व्यवस्था.
हिच्या योग्य राबणुकिवर लोकांचे लक्ष हवे.
संघ संपूर्ण समाजाचे संघटन करतो, संघ एक पक्ष होऊ शकत नाही, पक्षाचा पाठिराखा नाही.
राष्ट्रहितास प्राधान्य देणारे निवडावेत.
मतदान राष्ट्रीय कर्तव्य.
सत्ता योग्य पद्धतीने राबविली जावी यावर लक्ष.
देशाची सुरक्षा, विकास व ऐक्य यावर बाधा नको.
राजकीय शक्तीवर लोकशक्तीचा अंकुश, हा विविध सामाजिक संस्थाद्वारा निर्माण.



३ समाजात नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण

समाजात नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण
समाजावरील प्रेम व सामाजिक समस्यांच्या संदर्भात संवेदना व्यक्त करणारे व्यक्तिमत्व .
सामाजिक परिस्थितीची समज .
योजकता व संघटन कुशलता. माणसे जोडण्याचा स्वभाव .
नेतृत्व करणाऱ्या महापुरुषांच्या जीवनाचे अध्ययन व त्यापासून प्रेरणा .
परिस्थितीमुळे निराश न होणारा. विपरीत परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेऊन आशेचा किरण बनणारा
ध्येयावर अविचल निष्ठा .
उत्तम निर्णय क्षमता . समस्या न टाळता तिचा सामना करायचा .
अडचणींना संधीच्या स्वरूपात बदलणारा .
बुद्धीचातुर्य असणारा .
शुद्ध चारित्र्य असलेला .



४ स्वयंसेवकाचा सूक्ष्म दृष्टिकोन

१. कार्यक्रम आमच्या संघाचा नव्हे, आपल्या संघाचा.
२. यथाशक्ती नव्हे, तनमनधनपूर्वक.
३. दान नव्हे, समर्पण.
४. त्याग नव्हे, कर्तव्य.
५. सुमारे पाच वाजता नव्हे, ठीक पाच वाजता.
६. संख्या २७-२८ नव्हे, २७ किंवा २८.
७. तुम करो राष्ट्र आराधन नव्हे, हम करे राष्ट्र आराधन.
८. समाजातील संघटन नव्हे, समाजाचे संघटन.
९. मला मरायचे कसे शिकवा नव्हे, मला जगायचे कसे शिकवा.
१०. शीख आणि हिंदू नव्हे, केशधारी व सहजधारी हिंदू.
११. हिंदू मुस्लिम दंगा नव्हे, मुस्लिम दंगा.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा