श्रद्धांजली कार्यक्रम
१
हेमंत देव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत अनंत उपाख्य बाळ देव यांचे ११ जुलै रोजी दुखः द निधन झाले . केपे तालुक्यातील ते ज्येष्ठ संघ कार्यकर्ते होते . मूळ रिवण गांवचे रहिवासी असलेले देव सद्या शिरवई गावात राहात होते . सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ते प्रशिक्षक म्हणून नोकरी करीत होते . संघाचे कार्य करण्यास कठीण अशा केपे तालुक्यात संघाचे काम रुजविण्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता . कसलीही अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य करणे हे कठीणच आणि असे निरपेक्ष काम दीर्घकाळ करणे हि तर तारेवरची कसरत . ' श्रेयाचा मज नको लेशहि, निर्माल्यात विरावे ' असे संघगीतात म्हटले जाते . हेमंत देवांनी संघाचे काम अंतिम श्वासापर्यंत केले .
केपे तालुक्याचे कार्यवाह म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पहिले . भरपूर वाचन हे त्यांचे वैशिष्ट्य होते . संघाच्या बौद्धिक विभागात ते नेहमी कार्यरत असत . त्यांच्या अकाली निधनाने संघाकामाची मोठी हानी झाली आहे . हेमंत देवांच्या कार्याचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करण्यासाठी केपे तालुक्याने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला आहे . रविवार दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता उत्कर्ष हायस्कूलमध्ये श्रद्धांजली कार्यक्रम होईल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा