घडीपत्रक - केशव सेवा साधना
१.
बोधचिन्ह
केशव सेवा साधना
ओम, दुर्गानगर, बोरी, फोंडा, गोवा .
पिन ४०३४०१
फोन - ०८३२ . २३३३१५०
Email : info@kssgoa.org
Website : kssgoa.org
Register Under Soc.Reg.Act.21 of 1860
No. 67/Goa/92 dt. 16/04/92
Pan Card No. AAATS7231B
FCRA Reg. No. : 271800003 dt. 02/05/2012
80G/CIT/PNJ/2009-10/10-K
dt. 24/06/2009 valid from 1-4-2009
Contact
Adv. Govind K. Hegade Desai
President
Mob. No. 9822129070
Shri Laxman (Nana) Behere
Secretary
Mob. No. 09422443165 / 08390643165
२.
विद्यार्थी वसतिगृह प्रकल्प
१ . माताजी मंदिर विद्यार्थी वसतिगृह, काणकोण
२ . श्रीपरशुराम विद्यार्थी वसतिगृह, पैंगीण
३ . श्रीदुर्गामाता विद्यार्थी वसतिगृह, नेत्रावळी
शिक्षण हि मानवाची मुलभुत गरज होय . ती पूर्ण करणे ही सरकारची तसेच समाजाचीही प्राथमिक जबाबदारी आहे . गोव्यातील काणकोण, सांगे, सत्तरी, पेडणे या तालुक्यात असलेल्या शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी , अत्यंत दुर्गम गावातील मुलांनी शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या तालुक्यात जाणे , खोली करून तिथे राहणे , त्यामुळे मुलांचा येणारा कमी निकाल बघून केशव सेवा साधनेने विद्यार्थी वसतीगृहांची उभारणी केली आहे . अशिक्षा, अज्ञान, गरिबी नाहीशी करून चांगले नागरिक निर्माण करायच्या या प्रयत्नात आज स्वतंत्र इमारतीसह २ व विनावापर सरकारी इमारतीत १ अशी ३ वसतिगृहे सुरु केली आहेत . या तिन्ही वसतिगृहात आज २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांना मल्लखांब क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळालेली असून एका वसतिगृहाला समाजकल्याण खात्याकडून बसही देण्यात आलेली आहे .
' सेवा परमो धर्मः ' असे म्हणत सेवाभावी वृत्तीने केशव सेवा साधना काम करीत आहे . शिक्षणाच्या चांगल्या सोयींमुळे पालकांच्याही आकर्षणाचा विषय असलेल्या या वसतिगृहात आज विद्यार्थी संख्या वाढत आहे . संस्थेचे कार्यकर्ते ,हितचिंतक , विद्यार्थ्यांचे पालक हे धान्य ,भाजीपाला , वस्तू , रोख या स्वरुपात मदत करतात . पण वाढत्या महागाईमुळे अनेक सोयी मनात असूनही देणे शक्य होत नाही . नेत्रावळी, सांगे येथे श्रीदुर्गामाता विद्यार्थी वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारतीचाही विचार सुरु झाला आहे . समाजाच्या दातृत्व शक्तीवर हे प्रकल्प पुढे जातील असा सार्थ विश्वास बाळगून साधनेचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे .
३ . ४ .
' विशेष मुलांची शाळा ' , डिचोली .
' विशेष मुलांची शाळा ' , वाळपई .
प.पू. श्रीगुरुजी एकदा म्हणाले होते, ' जनतेमध्ये जनार्दन पाहण्याची श्रेष्ठ दृष्टी हीच आमच्या राष्ट्र कल्पनेचे हृदय आहे. या दृष्टीमुळेच समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या दिव्य अशा पूर्ण रूपाचा अंश पाहण्याची प्रेरणा आम्हाला मिळते. '
५ .
१. श्रीमल्लिकार्जुन वाचनालय, श्रीस्थळ :- केशव सेवा साधनेच्या ह्या सेवावृक्षाला आज अनेकानेक फांद्या फुटलेल्या आहेत . समाजातील विविध गरजांचे समाधान आज त्या करीत आहेत . ग्रामीण भागातील वाचनाची गरज लक्षात घेऊन श्रीस्थळ, काणकोण येथे श्रीमल्लिकार्जुन वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे . या वाचनालयात आजच्या घडीला उत्तमोत्तम पुस्तके व नियतकालिके वाचनासाठी उपलब्ध आहेत . गावातील लोक या सुविधेचा लाभ घेत आहेत .
२ . मेधा पर्रीकर रुग्ण सेवा केंद्र, म्हापसा :- म्हापसा येथे मेधा पर्रीकर रुग्ण सेवा केंद्राच्या वतीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली आहे . अनेकानेक रुग्णोपयोगी उपकरणांनी सुसज्ज अशी ही रुग्णवाहिका अत्यंत कमी वेळात रुग्णांना उपलब्ध होत आहे . सरकारी सेवेपेक्षा अधिक प्राथमिकता लोक या केंद्राला देत असून अत्यल्प दरात ती आज गरजुना सेवा देत आहे .
३ . ग्राम आरोग्य रक्षक योजना, सत्तरी :- सत्तरी तालुक्यातील वैद्यकीय अपुरेपणाची जाणीव लक्षात येताच ग्राम आरोग्य रक्षक योजना सुरु करण्यात आली आहे . प्रथमोपचाराचे शिक्षण घेतलेले आरोग्य रक्षक गावात सेवा देत आहेत . सरकारी व्यवस्थेवरच ताणही त्यामुळे कमी झालेला आहे .
४ . लीलाताई चि . गोखले आरोग्यकेंद्र, पैंगीण :- पैगीण गावातील लोकांसाठी लीलाताई चि . गोखले आरोग्यकेंद्र साधनेने सुरु केले आहे . मुख्य सरकारी रुग्णालय दूर पडत असल्यामुळे छोट्या छोट्या आजारांवर उपचार करण्यासाठी अनेक रुग्ण या आरोग्यकेंद्रात आवर्जून येत असतात .
५ . अल्पकालीन कार्ये :- वेळोवेळी तत्कालीन व्यवस्था म्हणून अनेक कामे गोव्यात उभी केली गेली . फिरता दवाखाना , रुग्णोपयोगी साहित्य केंद्र , प्रथमोपचार पेट्या, श्रमसंस्कार शिबिरे , निःशुल्क वैद्यकीय चिकित्सा शिबिरे , रक्तदान शिबिरे , रक्तदाता सूची , अभ्यासिका , बालवाड्या , बाल संस्कार केंद्रे चालविली गेलीत .
६ . आपत्कालीन कार्य :- समाजावर जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा केशव सेवा साधना आधार म्हणून उभी राहिली आहे . मराठवाड्यातील भूकंप , आंध्रप्रदेशातील वादळ , कारगिल युद्ध , गुजरात्त भूकंप तसेच मडगावातील नव्या बाजारातील आग , डिचोलीमधील पूर , काणकोण पूर अशा प्रत्येक वेळी साधनेने निधी गोळा करणे , प्रकल्प उभा करणे अशी कामे केली आहेत . गुजरात मधील नागरपाल गावी कन्या शाळेसाठी ८ खोल्यांचे बांधकाम साधनेने करून दिले आहे .काणकोण पूरग्रस्तांनासाठी पूर्ण ४ घरांची बांधणी साधनेने समाजाच्या सहकार्याने केली .फोंडा तालुक्यातील सावईवेरे भागात २७५ चौ . फुटांचे ६ फुट खोल तळे खोदले . स्थानिक लोकांच्या गरजनुरुप कार्य उभे राहावे म्हणून त्या त्या संकटग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर निधीही साधने द्वारा पाठविण्यात आलेला आहे .
६.
माणसाला शिकविणे , मोठे करणे , त्याच्या योगक्षेमाची चिंता वहाणे , त्याच्या निराकरण करणे , हि सगळी कामे खरे म्हणजे समाजानेच करायला हवीत . आणि तसा तो करतोही . माणसाच्या ठिकाणी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधी त्याला तो देतो . वृक्ष जसा आपली फळे आपण खात नाही तसा हा माणूसही समाजाकडून मिळालेल्या संपत्तीचा भाग पुन्हा समाजाला देतो . असा भाग जितका मोठा तितका तो समाज मोठा . अशा माणसांची संख्या जितकी अधिक तितका तो समाज संपन्न , अधिक महान . अश्या समाज निर्मितीची साधना केशव सेवा साधना करीत आहे . सेवा कार्यकर्त्यांच्या या सद्भावाला तन मन धनपूर्वक बळ देण्याचे आवाहन करीत आहोत .
आपला अपेक्षित सहभाग
१. वसतिगृह विद्यार्थ्याचा एका वर्षाचा वैद्यकीय खर्च रु . १५००
२. वसतिगृह विद्यार्थ्याचा एका वर्षाचा शैक्षणिक खर्च रु . २०००
३. वसतिगृह विद्यार्थ्याचा एका वर्षाचा निवास खर्च रु . ८०००
४. वसतिगृह विद्यार्थ्याचा एका वर्षाचा एकूण खर्च रु . १००००
५. वसतिगृह विद्यार्थ्याचा एकूण शैक्षणिक खर्च रु . ५००००
६. विशेष विद्यार्थ्याचा एका वर्षाचा वैद्यकीय खर्च रु . ३०००
७. विशेष विद्यार्थ्याचा एका वर्षाचा शैक्षणिक खर्च रु . ५०००
८. विशेष विद्यार्थ्याचा एका वर्षाचा एकूण खर्च रु . ८०००
९. विशेष विद्यार्थ्याचा एकूण शैक्षणिक खर्च रु . १०००००
१० . वसतिगृहातील मुलांना एकवेळचे अन्नदान .
११ . जीवनातील मंगल प्रसंग सेवावास्तूत साजरा करणे .
१२ . आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ देणगी .
१३ . इमारत निधीसाठी रोख किंवा वस्तुरूप सहाय्य .
१४ . वास्तूतील दालनास पूर्वजाचे नाव देणे .
१५ . आपली मदत ही एका सेवाभावी ईश्वरीय कार्याला मिळेल .
१६ . सेवा साधक म्हणून तन मन धनपूर्वक सहकार्य .
आपली देणगी 80 G द्वारा करमुक्त असेल .

हाच दृष्टीकोण ठेऊन काम करणाऱ्या साधनेच्या कार्यकर्त्यांची एक सेवा बैठक डिचोली तालुक्यात घेण्यात आली होती . चर्चा चालू असताना सगळ्यांच्या लक्षात आले कि डिचोली तसेच आजुबाजुच्या तालुक्यामध्ये मोठ्या संख्येत मतीमंद मुले आहेत. या विशेष मुलांसाठी जवळपास शाळा उपलब्ध नाही. उपलब्ध शाळेत मुलांना नेणे आणणेही तसे कष्टाचे, खर्चाचे व जिकीरीचे. कार्यकर्त्यांच्या मनात विशेष शाळा सुरु करण्याचा विचार आला. प्रारंभिक तयारी म्हणून डिचोली व आजुबाजूच्या गावांमध्ये सर्वेक्षण सुरु करण्यात आले. सर्वेक्षणाचे आलेले इतिवृत्त कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे होते. विशेष शिक्षणाची सोय नसलेली व पुनर्वसनाची गरज असलेली ३०० मुले तिथे होती.
विशेष शाळा सुरु करण्याचा कार्यकर्त्यांनी निश्चय केला. मतिमंदत्व हा रोग नाही. ती एक कायम राहणारी अवस्था आहे. आईवडील, शिक्षक व समाज यांच्या सहकार्याने यांत थोडी सुधारणा होईल . मतिमंदत्व असलेली व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहील . तिचे परावलंबित्व कमी होईल . आत्मविश्वासात वाढेल . आणि हे एक प्रकारचे उपचारकेंद्र होईल.
अथक कार्यश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व, अश्राप पिलांचे पालनपोषण करणाऱ्या पालकांचे पालकत्व, आणि संवेदनशील दात्यांचे दानशूर दातृत्व अशी त्रिसूत्री घेऊन संस्थेने वाटचाल सुरु केली. इमारतीचा विचार पुढे येताच जागेची पाहणी सुरु झाली. आणि दात्यांच्या आशीर्वादाने अल्पावधीत विशेष विद्यालयाची स्वतंत्र इमारत तयार झाली. आज केशव सेवा साधना संचालित ' विशेष शाळा ' स्वतःच्या सुसज्ज वास्तुत सुरु आहे. कार्यकारी मंडळाची सक्रियता पाहता येत्या काही कालावधीत संस्था एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला येईल .

मतीमंद मुलांमध्ये विविध पात्रता असतात. विशेष शाळेचे कार्य म्हणजे या मुलांच्या विशेषता शोधून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकविणे. शाळेचा स्वतःच्या शरीराची स्वच्छता राखणे, स्वतःची कामे स्वतः करणे, छोट्या छोट्या गोष्टी करावयास लागणे, रस्त्यावरून आत्मविश्वासाने चालणे, दुकानात जाऊन सामान खरेदी करणे, साधे-सोपे खेळ खेळणे, अक्षर ओळख करवून घेणे, सोप्या वस्तू तयार करणे, करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घेणे अशी कामे हे विद्यार्थी करीत असतात. शाळेत मुलांना खेळ, व्यायाम शिकविला जातो. प्राणायामाचे प्रशिक्षण दिले जाते.
विशेष मुलांच्या शाळेत पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. आणि यासाठी शक्य तितक्या जवळ ती शाळा असावी असा हेतू बाळगून वाळपई येथे नव्या विशेष मुलांच्या शाळेचा शुभारंभ करण्यात आला आहे . हि शाळा लवकरच स्वतंत्र इमारत आणि सोयी यानिशी सुसज्ज होईल अशी आशा कार्यकते बाळगून आहेत .