रविवार, २१ सप्टेंबर, २०१४

डॉ . हेडगेवार - प्रश्नमंजुषा

                             डॉ . हेडगेवार - प्रश्नमंजुषा 

                                    अ . नाव सांगा 

१ . डॉ . हेडगेवार यांच्या वडिलांचे नाव काय ?
२ . डॉ . हेडगेवार यांच्या आईचे नाव काय ?
३ . डॉ . हेडगेवार यांच्या मूळ घराण्याचे तेलंगणातील गाव . 
४ . डॉ . हेडगेवार यांच्या भावांची नावे सांगा .
५ . डॉ . हेडगेवार यांच्या बहिणीची नावे सांगा .
६ . रामपायलीला राहणारे डॉक्टरांचे चुलते .
७ . पू . डॉक्टरांना आवडलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ग्रंथ . 
८ . संघाची पहिली प्रतिज्ञा झाली ते स्थान . 
९ . अनुशिलन समितीतील डॉक्टरांचे टोपण नांव .
१० . डॉक्टरांनी उदघाटन केलेला चित्रपट .  


                                    आ . पूर्ण नाव सांगा 

११ . डॉ . हेडगेवार यांचे पूर्ण नाव काय ? 

१२ . डॉ . हेडगेवार यांची पहिली शाळा कोणती ? 
१३ . डॉक्टर ' भांगेतील तुळस ' असा कोणाचा उल्लेख करीत ?
१४ . संघाला लाठीकाठीचे शिक्षण कोणापासून मिळाले ? 
१५ . डॉक्टरांना संघासाठी मदत केलेले राजे कोण ? 
१६ . डॉक्टरांची वैद्यकीय पदवी .  . 
१७ . डॉक्टरांनी नियुक्त केलेले द्वितीय सरसंघचालक . 
१८ . कोल्हापूर संस्थानातील संघ कार्याचे नाव . 
१९ . स्वातंत्र्यवीरांचे पूर्ण नाव . 
२० . डॉ . मुंजे यांचे पूर्ण नाव .  

                                

                                     इ . तिथी सांगा 

२१ . डॉ . हेडगेवार यांची जन्मतिथी सांगा .

२२ . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना . 
२३ . संघाचा पहिला रक्षाबंधन उत्सव . 
२४ . संघाचा पहिला गुरुपूजन उत्सव . 
२५ . संघाचा पहिला विजयादशमी उत्सव . 
२६ . संघाचे पहिले सघोष संचलन . 
२७ . राष्ट्र सेविका समितीची स्थापना . 
२८ . गुढीपाडवा . 
२९ . हिंदुसाम्राज्यदिनोत्सव . 
३० . प . पू . डॉक्टरांचे निधन . 


                                     ई . दिनांक सांगा


३१ . डॉ . हेडगेवार यांची जन्म दिनांक सांगा .

३२ . इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा ६० वा राज्यारोहण वर्धापनदिन .
३३ . बंगालची फाळणी कधी झाली ?
३४ . क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा अलीपूर बॉम्ब धमाका .
३५ . जालीयानववाला बाग हत्याकांड .
३६ . लोकमान्य टिळकांचे निधन . 
३७ . नागपूरचा प्रसिद्ध मुस्लिम दंगा कधी झाला ?
३८ . स्वामी श्रद्धानंदांची हत्या कधी झाली ?
३९ . सर्व शाखांवर भगवा ध्वज उभारून ' स्वातंत्र्यदिन ' पाळला . 
४० . यवतमाळ येथील जंगल सत्याग्रह सुरु . 


                                     उ . कोणी कोणास म्हटले ते सांगा . 


४१ ." परीचयावाचून एखाद्याला नमस्कार करणे हा कुठल्या देशातील शिष्टाचार ! "

४२ . " अविवाहित राहून जन्मभर राष्ट्रकार्य करण्याचा मी निश्चय केला आहे . "
४३ . " मजजवळ गमजा नकोत ! हा काही मुसलमानांचा देश नाही . "
४४ . " हिंदू-मुसलमान ऐक्य या शब्दप्रयोगामुळे ऐक्याऐवजी फुटीरतेचीच भावना वाढीस लागेल . " 
४५ . " आपली अनुमती असल्यास मी संघासाठी चार जणाजवळ शब्द टाकून पैसे जमवून देईन . " 
४६ . " पंडितजी मला पैशांपेक्षा आपल्या सारख्यांच्या  आशीर्वादाची आवश्यकता आहे . " 
४७ . " आपण करीत असलेली सुश्रुषा पाहून वाटते की दादा परमार्थ तुमचा मानसपुत्रच वाटतो . 
४८ . " या जिवंत साहित्यातून हिंदुस्थानात हिंदुराष्ट्राचा नवाकाळ निर्माण होईल . " 
४९ . " आपले चारित्र्य व कार्यावरील अढळ निष्ठा यांच्या बळावर आपण आपल्या अंगीकृत कार्यात निश्चित यशस्वी व्हाल . "
५० . " नाशिकमध्ये ' हिंदू कॉलनी ' ही पाटी कशी ? हिंदुस्थानातील वसाहतीला हे नाव योग्य नव्हे . " 


                                     ऊ . संस्था, संघटनेचे नाव सांगा . 


५१ . श्री . पुलीनबिहारी दास यांनी सुरु केलेली क्रांतिकारी संघटना .

५२ . डॉ . ल . वा . परांजपे यांनी सार्वजनिक कार्यासाठी स्थापन केलेली संघटना .
५३ . श्री . गोविंद चोळकर यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेली संस्था . 
५४ . डॉ . मुंजे यांनी नेमबाजीचा सराव करण्यासाठी स्थापन केलेली संस्था .
५५ . श्री . दत्तोपंत मारुलकर यांनी व्यायाम करण्यासाठी स्थापलेली संस्था 
५६ . श्री . बाबाराव सावरकर यांनी स्थापन केलेली तरुणांची संघटना . 
५७ . संत पाचलेगांवकर यांनी संगमनेर येथे हिंदू रक्षणार्थ स्थापन केलेले दल . 
५८. डॉक्टरांच्या प्रेरणेने अप्पाजी जोशी यांनी सुरु केलेली स्वयंसेवक संघटना .  . 
५९ . वं . लक्ष्मीबाई केळकर यांनी संगठीत केलेली हिंदू मातृशक्ती . 
६० . डॉ . मुंजे यांनी स्थापन केलेले सैनिकी विद्यालय .     


                                     ए .  अचूक पर्याय निवडा . 


६१ . विद्यार्थ्यांना सभा मिरवणुकात भाग घ्यायला बंदी केकेले परिपत्रक . 

६२ . पहिल्या तुरुंगवासातील एका वर्षात वाढलेले वजन . 
६३ . पहिला आद्यसरसंघचालक प्रणाम दिला . 
६४ . संघाचे काम आपण या क्षमतेने करावे . 
६५ . भारतीय ध्वजसमितीने ठरविलेला राष्ट्रीय झेंडा . 
६६ . पू . डॉक्टरांचे पूर्ण गणवेशातील छायाचित्र कोठे घेण्यात आले ? 
६७ . पू . डॉक्टरांना एकदा भेटताच संघमय बनलेले चित्रपट दिग्दर्शक. 
६८ . फैझपूर कोन्ग्रेस अधिवेशनात गुंतलेला तिरंगी झेंडा सोडवलेला स्वयंसेवक .  
६९ . पुणे हिंदू युवक परिषद अध्यक्ष पू . डॉक्टरांचे निवासस्थान . 
७० . पू . डॉक्टरांचे दणकट भोजन कसले होते ?  


                                     ऐ . 
डॉक्टरांनी कार्यकर्त्यांना संघकार्यार्थ  पाठविलेले गाव
७१ . पू . श्रीगुरुजी 
७२ . माधवराव मुळे
७३ . गोपाळराव येरकुंटवार 
७४ . दादाराव परमार्थ 
७५ . बाबासाहेब आपटे
७६ . बाबासाहेब चितळे
७७ . भय्याजी दाणी
७८ . कृष्णराव वडेकर
७९ . राजाभाऊ पातुरकर  
८० . भाऊराव देवरस     


                                     ओ . उद्गार कोणत्या प्रसंगी काढले . 


८१ . " परक्या राजाचा राज्यारोहण समारंभ साजरा करणे हे लाजिरवाणे काम . " 

८२ . " खरे रावण मारणे म्हणजे काय ! " 
८३ . " त्यांच्या मूळ भाषणापेक्षा त्यांचे हे समर्थनच अधिक राजद्रोहपूर्ण आहे . " 
८४ . " जंगल सत्याग्रह केला काय नि गाईसाठी सत्याग्रह केला काय, मला दोन्ही सारखेच . " 
८५ . " काशी विश्वनाथाच्या मंदिराजवळ मशीद का असा प्रश्न हिंदू मनाला का पडत नाही ? " 
८६ . " नागपुरात त्या दिवशी २०० संघशाखा निर्माण होतील ! "
८७ . " रा . स्व . संघ म्हणजे राष्ट्राचे कवच होय . " 
८८ . " ते घरात आल्यापासून आम्हाला असे वाटू लागले की, आमच्या घरातीलच कोणी वडीलधारा मनुष्य बाहेरगावांहून आला आहे . "
८९ . " भारत आमचा बगीचा आहे नि आम्ही त्यातील लहान लहान बुलबुल पक्षी आहोत . "
९० . " मी पाच वर्षांपूर्वी संघाचा सदस्य होतो . ' असले वाक्य उच्चारण्याचा प्रसंग आयुष्यात केव्हाही येऊ देऊ नका . " 


                                     औ .  प्रसंगाचे वर्णन करा . 

९१ . विहीर उपसणे .
९२ . पं . राधामोहन भल्या पहाटे रामायणातील चौपाया मोठमोठ्याने म्हणणे . 
९३ . चुना आणा चुना आणा ! 
९४ . ती तुळई पेटलीय . त्यासाठी संघ काय करणार आहे ? 
९५ . पर्यवेक्षकाचे आगमन ' वन्दे मातरम ! वन्दे मातरम ! ' 
९६ . आपण सीताबर्डी किल्ला जिंकला पाहिजे . 
९७.  प्रणाम आदरामुळे केला जातो . भीक मागून किंवा जबरदस्तीने नव्हे . 
९८ . अरे तू माणूस कि राक्षस ? 
९९.  ते दोघेही संघाचे स्वयंसेवक आहेत . 
१०० . आपली सेवा मुळीच करता आली नाही . 


                                      अं . एका शब्दात उत्तर द्या . 


१०१ . डॉक्टरांच्या आईवडिलांचा मृत्यू कशामुळे झाला ?

१०२ . शाळा तपासनिसाचे स्वागत विद्यार्थ्यांनी कोणत्या शब्दात केले ?
१०३ . डॉक्टरांनी शिक्षण घेतलेले कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालय .
१०४ . महाविद्यालयात असताना डॉक्टर एका वेळी किती पोळ्या खात असत ? 
१०५ . डॉक्टरांनी चालविलेले दैनिक वृत्तपत्र . 
१०६ . डॉक्टरांनी संघातील आज्ञा कोणत्या भाषेत सुरु केल्या ? 
१०७ . सुरुवातीला संघाची प्रार्थना कोणत्या भाषेत होती ? 
१०८ . संघाच्या पहिल्या प्रतिज्ञा कार्यक्रमाला किती स्वयंसेवक उपस्थित होते ? 
१०९ . संघात गुरुस्थानी कोणाला मानले जाते ? 
११० . डॉक्टरांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला ? 


                                      अः . पूर्ण वाक्यात उत्तर द्या . 


१११ . श्री . वझे गुरुजींच्या खोलीत भुयार का खणले ?

११२ . रसायन प्राध्यापकाकडून घरी जाताना डॉक्टर व मित्र रात्री जिन्यात कशाला धडपडले ?
११३ . १९२० च्या कांग्रेस अधिवेशनात डॉक्टर कोणते प्रमुख होते ?
११४ . डॉक्टरांनी स्वयंसेवका कडून कोणत्या यात्रेचे नियोजन केले ? 
११५ . स्वयंसेवकांनी संघटनेसाठी सुचविलेली ३ नावे . 
११६ . संघाची पहिली मैदानी शाखा कोठे लागली ?
११७ . डॉक्टरांनी स्वयंसेवकांच्या पथकांना दिलेली नावे सांगा . 
११८ . संघशिक्षा वर्गाला पूर्वी कोणते नाव होते ? 
११९ . इंग्रज सरकारने भगतसिंग , सुखदेव व राजगुरू यांना कोठे फाशी दिली ? 
१२० . डॉक्टरांनी संघासाठी जागा विकत कोठे घेतली ? 
१२१ . काँग्रेसने आपल्या सभासदांना संघात जायला बंदी कधी घातली ? 
१२२ . महात्मा गांधींनी संघाचे दर्शन केव्हा घेतले ? 
१२३ . वर्तमानपत्रात वा समारंभात संघावर आरोप आल्यावर काय करावे असे डॉक्टर म्हणत ? 
१२४ . पू . डॉक्टरांचे शेवटच्या भाषणातील महत्वाचे वाक्य कोणते ? 
१२५ . पू . डॉक्टरांच्या पत्रांवर अग्रभागी कोणते  सुभाषित असे ?


                              डॉ . हेडगेवार - उत्तरमाला 


                                     अ . नाव सांगा 


१ . श्री . बळिराम महादेव हेडगेवार

२ . सौ . रेवतीबाई बळिराम हेडगेवार
३ . कंदकूर्ती
४ . महादेव . सीताराम .
५ . राजू . शरयू . रंगू .
६ . श्री . आबाजी श्रीधर हेडगेवार
७ . हिंदुत्व
८ . स्टार्की पोइंट
९ . कोकेन 
१० . भगवा झेंडा   


                                    आ . पूर्ण नाव सांगा

११ . डॉ . केशव बळिराम हेडगेवार

१२ . नील सिटी हायस्कूल  
१३ . मौलवी लियाकत हुसेन
१४ . कै . दामोदर बळवंत तथा भिडे भटजी . 
१५ . नागपूरचे राजे श्रीमंत लक्ष्मणराव भोंसले . 
१६ . एल .एम . एन्ड एस . ( लायसेन्शिएट ऑफ मेडिसिन एन्ड सर्जरी ) 
१७ . श्री . माधव सदाशिव गोळवलकर  
१८ . राजाराम स्वयंसेवक संघ 
१९ . स्वा . विनायक दामोदर सावरकर 
२० . डॉ . बाळकृष्ण  शिवराम मुंजे 

                                

                                     इ . तिथी सांगा 

२१ . चैत्र शुक्ल प्रतिपदा शके १८११

२२ . विजयादशमी , अश्विन शुक्ल दशमी शके १८४७ 
२३ . नारळीपौर्णिमा , श्रावण पौर्णिमा शके १८४८
२४ . आषाढ पौर्णिमा शके १८५०
२५ . विजयादशमी , अश्विन शुक्ल दशमी शके १८४८  
२६ . विजयादशमी , अश्विन शुक्ल दशमी शके १८५० 
२७ . विजयादशमी , अश्विन शुक्ल दशमी शके १८५८
२८ . चैत्र शुक्ल प्रतिपदा . 
२९ . ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी . 
३० . ज्येष्ठ कृष्ण द्वितीय शके १९६२


                                     ई . दिनांक सांगा


३१ . १ एप्रिल १८८९

३२ . २२ जून १८९७
३३ . २९ सप्टेंबर १९०५
३४ . ३० एप्रिल १९०८
३५ . १३ एप्रिल १९१९
३६ . ३१ जुलै १९२०
३७ . ४ सप्टेंबर १९२७
३८ . २३ डिसेंबर १९२७
३९ . २६ जानेवारी १९३० 
४० . २१ जुलै १९ ३०   

                                     उ . कोणी कोणास म्हटले ते सांगा . 


४१ . डॉक्टरांनी यवतमाळच्या इंग्रज जिल्हाधिकारयाला

४२ . डॉक्टरांनी आबाजींना .
४३ . रेल्वे तिकीट तपासनिसाने डॉक्टर हेडगेवार व मुंजे यांना .
४४ . डॉक्टरांनी महात्मा गांधीना .
४५ . पं . मदन मोहन मालवियांनी डॉक्टरांना . 
४६ . डॉक्टरांनी पं . मदन मोहन मालवियांना . 
४७ .  श्री . दादासाहेब सोमण यांनी डॉक्टरांना . 
४८ . श्री . काकासाहेब खाडिलकर यांनी डॉक्टरांना . 
४९ . महात्मा गांधींनी पू . डॉक्टरांना . 
५० . डॉक्टरांनी वकील श्री . राजाभाऊ साठे यांना . 


                                     ऊ . संस्था, संघटनेचे नाव सांगा . 


५१ . अनुशिलन समिती .

५२ . भारत स्वयंसेवक मंडळ .
५३ . अनाथ विद्यार्थी गृह . 
५४ . रायफल असोसिएशन . 
५५ . महाराष्ट्र व्यायामशाळा . 
५६ . तरुण हिंदुसभा . 
५७ . मुक्तेश्वर दल . 
५८ . राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ  . 
५९ . राष्ट्र सेविका समिती . 
६० . भोसला मिलिटरी स्कूल . 


                                     ए .  अचूक पर्याय निवडा . 


६१ . अ . मोंटेग्यू  सर्क्युलर                आ . रिस्ले सर्क्युलर                इ . मेकॉले सर्क्युलर

६२ . अ . २०   आ . २५  इ . ५०
६३ .  अ . बाळाजी हुद्दार   आ . अप्पाजी जोशी   इ . मार्तंडराव जोग 
६४ . अ . फुल ना फुलाची पाकळी  आ . तनमनधन पूर्वक  इ . यथाशक्ती 
६५ . अ . तिरंगा  आ . चौकोनी केशरी  इ . भगवा 
६६ . अ . मुंबई आ . सांगली  इ . नागपूर 
६७ . अ . दादासाहेब फाळके  आ . भालजी पेंढारकर  इ . पृथ्वीराज कपूर
६८ . अ . रामशरण राजपूत  आ . किसनसिंग परदेशी इ . दयाप्रसाद वर्मा 
६९ . अ . गो . नि . दांडेकर  आ . प्र . के . अत्रे  इ . बाबासाहेब पुरंदरे 
७० . अ . मांसाहारी  आ . शाकाहारी  इ . शाकाहारी व मांसाहारी  


                                     ऐ . डॉक्टरांनी कार्यकर्त्यांना संघकार्यार्थ  पाठविलेले गाव . 

७१ . कोलकाता 
७२ . कोंकण 
७३ . सांगली 
७४ . पुणे 
७५ . जळगांव 
७६ . मुंबई
७७ . काशी 
७८ . धुळे  
७९ . पंजाब
८० . उत्तर प्रदेश  


                                     ओ . उद्गार कोणत्या प्रसंगी काढले . 


८१ . इंग्लंडचा राजा सातवा एडवर्ड राज्यारोहण १९०१

८२ . रामपायलीला दसरा उत्सवात रावण जाळण्याच्या प्रसंगी .
८३ . न्यायाधीश स्मेली डॉक्टरांना १९२१ साली एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देताना . 
८४ . जंगल सत्याग्रहावेळी पुसद गावात गाईला सोडविताना . 
८५ . काशी नगरीत संघकाम वाढविण्यासाठी घेतलेल्या बैठकीत . 
८६ . मध्यप्रांत सरकार संघावर बंदी घालण्याचा विचार करीत होते तेव्हा . 
८७ . लोकनायक बापुजी अणे यांनी नागपूर जिल्हा शिबीर समारोप कार्यक्रमात बोलताना . 
८८ . पुणे हिंदू युवक परिषदेसाठी अध्यक्ष पू . डॉक्टर आचार्य अत्रे यांच्या घरी आले असताना आचार्यांनी लिहिले . 
८९ . कवी इक्बाल यांचे ' सारे जहां से अच्छा ' गीत ऐकल्यावर पू . डॉक्टर . 
९० . संघशिक्षा वर्गात झालेले प . पू . डॉक्टरांचे शेवटचे भाषण . 


                                      औ .  प्रसंगाचे वर्णन करा . 


९१ . नवीन विहीर - उद्यापनापूर्वी उपसणे आवश्यक - तिन्ही भावांची चर्चा -  प्यायचे पाणी भरले - एका रात्रीत उपसली . 

९२ . तुरुंगात - इनामुल्ला - खिलाफती ज्वर - पहाटे मोठ्याने नमाज - समजाविले - न ऐकणे - चौपायांचा उपाय - नमाज बंद .  
९३ . समारंभात पानदानातील चुना संपला - जण एकटा दुसऱ्याला - चुना आणा - डॉक्टरांनी आणला - कामचुकारपणा . 
९४ . महिलेवर अत्याचार - संघ काय करणार ? - घर पेटलेय - लोकांना वाचविण्याचा प्रयत्न - एका बघा - तुळई पेटलीय - काही करा - डॉक्टर - तुम्ही प्रयत्न करा - व्यक्तीशः मदत. 
९५ . रिस्ले सर्क्युलर - विद्यार्थ्यांना सभा मिरवणुकात भाग घ्यायला बंदी - आंदोलन - शाळा तपासनीस - घोषणांनी स्वागत . 
९६ . वझे गुरुजींकडे शिकवणी - भगवा ध्वज दिसे - जिंकायचा कसा - भुयार - साधने - खणणे सुरु - गुरुजींनी बघितले - शाबासकी 
९७ . यवतमाळला - इंग्रज जिल्हाधिकारी - प्रणाम करायचा नियम - डॉक्टरांनी केला नाही - साहेबाबरोबरच्याने सुचविले - अनोळखी माणसाला ? - इंग्रजीही शिष्टाचार नाही - त्याची क्षमताही नाही . 
९८ . कॉलेज - घोष नावाचा विद्यार्थी - तू व्यायामपटू ना - माझ्या दंडावर बुक्क्या मार - आधी तू मार - थकला - डॉक्टर शांत - तू … 
९९ .  पुण्याचा लकडी पूल - डॉक्टर व काशिनाथपंत लिमये चालतात - दोन मुले गेली - डॉक्टर ' हि संघाची ' - लिमये ' कशी ? ' - डॉक्टरांनी बोलावले - ओळखता ? - मुले ' तुम्ही आमचे पू . हेडगेवार, हे सांगलीचे काशिनाथपंत लिमये .  
१०० . डॉक्टर अत्यंत आजारी - नागपूर संघशिक्षावर्ग - खाजगी समारोप - डॉक्टरांचे भाऊक भाषण . 


                                      अं . एका शब्दात उत्तर द्या . 


१०१ . प्लेग .

१०२ . वन्दे मातरम .
१०३ . नेशनल मेडिकल कॉलेज .
१०४ . वीस ते पंचवीस .
१०५ . स्वातंत्र्य .
१०६ . भारतीय भाषात . 
१०७ . हिंदी .  
१०८ . ९९
१०९ . भगवा ध्वज . 
११० . मेंदूचा रक्तस्त्राव ( पॉटाइन हिमरेज ) . 


                                      अः . पूर्ण वाक्यात उत्तर द्या . 


१११ . सीताबर्डी किल्ल्यावरील युनियन जैक काढून भगवा झेंडा लावण्यासाठी .
११२ . त्यांच्यावर पाळत करणाऱ्या गुप्तहेराला .
११३ . कांग्रेस अधिवेशनातील स्वयंसेवक  दलाचे .
११४ . रामटेक येथील रामनवमी यात्रा . 
११५ . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जरीपटका मंडळ, भारतोद्धारक मंडळ . 
११६ . साळुबाई मोहिते यांचा मोहिते वाडा . 
११७ . लव, चिलया, कुश, ध्रुव, प्रह्लाद, अभिमन्यू , भीम, भीष्म . 
११८ . अधिकारी शिक्षणवर्ग ( ऑफिसर्स ट्रेनिंग केंप ) 
११९ . रावळपिंडी (लाहोर) येथील कारागृहात . 
१२० . नाग नदीपलीकडील रेशीमबाग येथील तुकारामपंत जोनकळकर यांची २०० एकर जागा .
१२१ . १९३४ च्या जून महिन्यात .  
१२२ . वर्धा , २५ डिसेम्बर १९३४ . 
१२३ . तिकडे पूर्ण दुर्लक्ष करावे . 
१२४ . आज माझ्यासमोर हिंदुराष्ट्राचे छोटे स्वरूप मी पाहत आहे . 
१२५ . दया तिचे नाव । भूतांचे पाळण । आणिक निर्दालन । कंटकांचे ।।

                                                   समाप्त 

                                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा